चार वर्षांपूर्वी थोडासा पाऊस झाला तरी प्रभागातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचायचे. नागरिकांना होणाऱ्या या गंभीर समस्येवर उपाय म्हणून, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक एकनाथ भोईर व नगरसेविका सौ. एकता एकनाथ भोईर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी, गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाल्यांची स्वच्छता, नवे नाले बांधकाम आणि पाण्याचा योग्य प्रवाह सुनिश्चित करणारे काम करण्यात आले.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित म्हणजे—मागील चार दिवसांच्या अविरत पावसानंतर संपूर्ण मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले, तरी प्रभागात थेंबभरही पाणी साचले नाही.
ही यशोगाथा जनतेच्या जीवनमानात झालेल्या वास्तविक बदलाची ठोस साक्ष आहे.